असे असतील बीड जिल्ह्यातील नगरपंचायतचे नगराध्यक्ष; वडवणी सर्वसाधारण तर इतर…

बीड दि.27 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्यात नुकत्याच 5 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या असून आता नगराध्यक्ष (mayor) पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज गुरुवारी (दि.27) नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील पाचही नगर पंचायतसाठी नगराध्यक्ष आरक्षण पडले असून वडवणीचा नगराध्यक्ष सर्वसाधारण खुला असणार आहे.
(These are the mayors of Nagar Panchayat in Beed district; Vadvani general while others …)
जिल्ह्यात 5 नगर पंचायतच्या (Municipal council) निवडणूका होवून मतमोजणी अंति सत्तेवर कोणत्या पक्षाचा दावा असणार हे सिद्ध झाले आहे. मात्र नगराध्यक्ष (Mayor) पदाची आरक्षण सोडत झालेली नसल्याने नगराध्यक्ष पद कुणाला सुटणार? उपनगराध्यक्ष निवडी केव्हा होणार? असा प्रश्न निवडून आलेल्या नगरसेवकांसह सामान्य नागरीकांना पडला होता.
राज्य सरकारचे नगरविकास खाते (Urban Development Department) नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या सोडतीत काही निकाल सुत्रांकडून हाती आले आहेत. आज सांयकाळी 4 वाजल्यापासून सोडत प्रक्रिया सुरु आहे. यात बीड जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडतीची माहिती हाती आली आहे. तशा पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मेडीयातही वायरल झाल्या आहेत.
असे आहे नगराध्यक्ष आरक्षण …
मिळालेल्या माहितीप्रमाणे आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर केज (Kaij) नगर पंचायत अनु.जाती व जमाती (SC) सर्वसाधारण तर वडवणी नगर पंचायत सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याचे कळते. याबाबत मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
ही आरक्षणाची (reservation) सोडत निघाल्यानंतर त्यासंबंधीचे गॅझेट प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्या-त्या जिल्ह्यांच्या नगरविकास विभागाकडे आरक्षणाची यादी पाठवणार आहे. त्यानुसार पुढे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे. मात्र आता नगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.