वाढदिवस साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची फटकेबाजी… पोलीसांनी केले आवाहन

किल्लेधारूर दि.१९(प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेल्या जमावाला पोलिसांनी फटकेबाजी करत पांगवल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली असून शहरात ही घटना चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (Police beat up activists celebrating birthdays)

आजच्या काळात वाढदिवसाची अनोखी परंपरा सुरू झाली आहे. अनेकांना वाढदिवस साजरे करत असताना कुठे आणि कसे साजरे करायचे व परिस्थितीचे भान राहिले नसल्याचे दिसुन येते. गेल्या चार दिवसांपासून राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात कलम १४४ लावल्याने जमाव बंदी लागली. पोलिस प्रशासन शहर व पोलिस ठाणे हद्दीत याबाबत लाऊडस्पिकरमधून नागरिकांना आवाहन करत आहे. यातच रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बर्थ डे बॉय आपल्या सुरक्षा रक्षक बांऊसर व कार्यकर्त्यांसह फटाक्यांची आतषबाजी करत रोड शो करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी वाढदिवस साजरा करणाऱ्या लोकांना पोलिसांनी मज्जाव केला. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तत्क्षणी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून चांगलीच धुलाई केली. यामुळे कार्यकर्त्यांची पाचावरधारण बसून सर्व कार्यकर्ते पसार झाले.
सदरील प्रकार ऐन चौकात घडल्याने शहरात याची मोठ्या चवीने चर्चा होत आहे.
(Police beat up activists celebrating birthdays)

कायदा मोडणाऱ्याची गय केली जाणार नाही- सुरेखा धस

याबाबत पोलिस ठाण्याच्या प्रभारी स.पो.नि. सुरेखा धस यांनी सद्यस्थिती पाहता लोकांनी एकत्र जमण्याचा प्रयत्न करु नये. कुठल्या सामाजिक, धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमात पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रीत येवू नये. तसेच आज होत असलेल्या शिवजयंती उत्सवाची मिरवणूक काढता येणार नसल्याचे सांगितले. लग्न कार्यासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना एकत्र येता येईल अशी माहिती दिली. कायदा मोडित काढणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!