कोरोंना विशेष

राज्यातील हे जिल्हे रेड झोनमध्ये? बीडचाही समावेश; उपमुख्यमंत्री पवार साधणार संवाद.

मुंबई/बीड दि.25 मे – राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने आकडेवारी उतरली आहे. राज्यात लावलेल्या कडक लॉकडाऊनचा हा परिणाम समजला जात असताना राज्यातील बीडसह 15 जिल्हे मात्र अजूनही रेड झोनमध्ये (Red Zone) आहेत. आज दि.25 मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.

(Which district in the state is in the red zone? Including Beed; Deputy Chief Minister Pawar will have a dialogue.)

राज्यात लॉकडाऊन लावूनही पंधरा जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या जिल्ह्यांचा आढावा घेणार असून यानंतरच या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होणार आहे.

या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये (Red Zone) समावेश.
बुलढाणा, कोल्हापूर (Kolhapur), रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड (Beed), गडचिरोली, अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. मुंबई-ठाण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर (Kolhapur), अहमदनगर (Ahemdnagar), सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर एवढ्याच जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या म्हणजे ॲक्टिव्ह कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबईत 28284 आणि ठाण्यात 24894 सक्रिय रुग्ण आहेत तर पुण्यात 51182 सक्रिय रुग्ण आहेत. साताऱ्यात 18336 तर सांगलीत 12211 आणि कोल्हापुरात 14919 आणि सोलापुरात 18487 तर नाशिकमध्ये 15946 आणि अहमदनगरमध्ये 16903 उपचार घेत असलेले रुग्ण आहेत.

विदर्भात नागपूरमध्ये कोरोनावर 17635 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दहा हजारांच्या आत आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे तर मराठवाड्यात लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भात वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तर पाच हजारांच्या आत आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट 92.51 टक्क्यांवर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊनसंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन (lockdown) 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसेच राज्यातील 15 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोन मधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन (lockdown) कायम राहणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

बीडमध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला.
बीड जिल्ह्यात 15 मे ते 25 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. गेल्या काही दिवसात हजाराच्या आत कोरोना बाधितांचा आकडा आला असला तरी पॉझिटीव्हीटी रेट मात्र 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे. अपेक्षित रिकव्हरी रेट (Recovery Rate) व पॉझिटीव्हीटी रेट नसल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा सहा दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. यात केवळ बि-बियाणे, खत व औषध विक्रिसह भाजीपाला विक्रीला दोन तासाची मुभा देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढला.

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बैठक घेवून या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत म्युकरमायोसिस,  सद्यस्थिती व उपाययोजना विषयी चर्चा होवून पुढील निर्देश देण्यात येणार आहेत. बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री व संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर या जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!