पदवीधर निवडणूकीत रंगत वाढणार; कशी होईल लढत… कोण आहेत उमेदवार पहा…

औरंगाबाद दि.१८- ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० Aurangabad graduates constituency election 2020 करिता दि.१७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणूकीसाठी आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रमुख उमेदवार म्हणून विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस NCP व महाआघाडीचे सतीश चव्हाण, भाजपाचे BJP शिरिष बोराळकर Shirish Boralkar, भाजपाचे बंडखोर रमेश पोकळे व एआयएमआयएमचे AIMIM डॉ. कुणाल खरात यांचा समावेश आहे. येत्या १ डिसेंबर रोजी पदवीधर मतदारसंघात नवीन आमदार निवडण्यासाठी मतदान होत आहे.
काल दि.१७ रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी अर्ज मागे घेत थेट भाजपावर निशाण साधला व महाआघाडीच्या सतीश चव्हाण Satish Chavan यांना पाठिंबा दिला. तर भाजपचेच बंडखोर रमेश पोकळे Ramesh Pokale अर्ज मागे घेतील असा कयास लावला जात असताना तेही अपक्ष निवडणूक रिंगणात कायम असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली. राष्ट्रवादीचे धारुर तालुकाध्यक्ष प्रा.इश्वर मुंडे यांनी पक्ष हितासाठी माघार घेतली. निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्ष, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी व आम आदमी पार्टीचेही उमेदवार रिंगणात आहेत. मात्र औरंगाबाद पदवीधरसाठी चौरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या ३५ उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) बोराळकर शिरीष Shirish Boralkar (पक्ष : भारतीय जनता पाटी BJP) औरंगाबाद २) सतीश भानुदासराव चव्हाण Satish Chavan (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP) औरंगाबाद ३) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी SP) औरंगाबाद ४) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर ५) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद ६) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद ७) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी ८) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी AAP) पुणे ९) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी १०) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद ११) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद १२) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ‘ के.सागर ‘ (पक्ष : अपक्ष ) नांदेड १३) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड १४) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड १५) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद १६) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद १७) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड १८) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड १९) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली २०) पोकळे रमेश शिवदास Ramesh Pokale (पक्ष : अपक्ष) बीड २१) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २२) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी २३) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड २४) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर २५) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २६) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना २७) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २८) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद २९) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड ३०) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड ३१) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड ३२) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद ३३) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड ३४) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड ३५) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.