धारुरमध्ये हनीट्रॕप … शिक्षकाला बलात्काराची धमकी देत दहा लाखाची मागणी; गुन्हा दाखल.

किल्लेधारूर दि.7 जानेवारी – शिक्षकाशी ओळख करून त्यानंतर इतरांच्या संगनमताने त्याला जबर मारहाण करत बळजबरीने त्याचा व्हिडिओ बनवून दहा लाखांची मागणी करत बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना धारूरमध्ये (Dharur) घडली असून या प्रकरणी शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Honeytrap in Dharur … Demanding Rs 10 lakh for threatening a teacher; Filed a crime.)
बाजीराव घनश्याम चौरे (वय 34) वर्षे, व्यवसाय शिक्षक, जिल्हा परिषद शाळा मांगवडगाव ता. केज जि. बीड, रा. तुकुचीवाडी ता. केज) यांनी धारूर पोलिसांना (Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शाळेवर मोहिनी बप्पासाहेब भांगे रा. डोका ता. केज या कोरो संस्थेच्या माध्यमातून येत होत्या. त्यावेळी बाजीराव चौरे या शिक्षकासोबत मोहिनी भांगे हिने ओळख करून घेतली.
फिर्यादीत (complaint) म्हटल्याप्रमाणे, दि. 9 नोव्हेंबर 2021 रोजी मोहिनी ही शिक्षक चौरे यांना धारूर येथे तिच्या मैत्रीणीला भेटायचे आहे, असे म्हणून मित्राच्या गाडीत घेऊन गेली. त्यानंतर गाडीत मोहिनीचा मित्र अशोक मिसाळ आणि इतर चार ते पाच अनोळखी इसमांनी शिक्षकाला मारहाण करत बळजबरीने मोहिनी भांगेच्या बाजुला बसवले.
यानंतर मोहिनीस मिठी मार, तिला किस कर तसेच माझे मोहिनीवर प्रेम आहे, आणि आमचे शारीरिक संबंध आहेत, असे म्हणायला लावत बळजबरीने व्हिडिओ बनविला व हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला दहा लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करून तुला आयुष्यभर जेलमध्ये टाकू, अशी धमकी दिली.
या प्रकरणी शिक्षकाने धारूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहिनी बप्पासाहेब भांगे व अशोक मिसाळ आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यूसुफवडगाव व केजमध्येही या टोळीने अनेकांना फसवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरील टोळीचा आणखी कुठे फसवणूकीचा प्रकार घडला का याचा पोलिस कसून तपास करत आहेत.