असा आहे पाच राज्यांचा निकाल; कोणत्या पक्षाला किती जागा?

दिल्ली दि.3 मे – देशातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रात्री जाहीर झाला आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तुणमूल काँग्रेसने (TMC) हॅटट्रिक केली आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आलं आहे. केरळमध्ये (LDF) ने सत्ता राखली, तर तामिळनाडूत एआयडीएमकेची सत्ता पालटली असून डीएमकेने मोठा विजय मिळवून सत्ता खेचून आणली. तर पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएने (NDA) काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे.

(This is the result of five states; How many seats for which party?)

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची हॅटट्रिक, पण ममता बॅनर्जी हरल्या…
देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. मात्र 292 विधानसभा सदस्य असलेल्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर निसटता विजय मिळवला.

दरम्यान, रात्री 9 वाजेपर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 292 पैकी तृणमूलला (TMC) 216, भाजप (BJP) 73, काँग्रेस 00 आणि अन्य 03 जागांवर आघाडीवर होते. बंगालमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन खेचून आणली आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी) (Election Final result 2021)
तृणमूल काँग्रेस -213
काँग्रेस -00
डावे – 01
भाजप – 77
एकूण – 292

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)
तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

आसाममध्ये भाजपने गड राखला (Election Final result 2021)
आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला 80, काँग्रेसला 45 आणि अन्य 1 अशा जागांवर आघाडी मिळाली.

आसामधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी)
भाजप – 80
काँग्रेस – 45
अन्य – 1
एकूण – 126

तामिळनाडूमध्ये बदल (Tamil Nadu)
तामिळनाडू विधानसभेत मोठा बदल झाला आहे. सत्ताधारी एआयडिएमके (AIDMK) ला मोठा झटका बसला आहे. डिएमके (DMK) ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. डिएमके (DMK) ने यापैकी 155 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी एआयडिएमके (AIDMK) ला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021
डिमके – 157
एआयडिएमके – 76
अन्य – 1
एकूण – 234

केरळमध्ये डाव्यांनी गड राखला (Kerla)
केरळमध्ये सत्ताधारी एलडिएफ (LDF) ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एलडिएफ (LDF) ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एलडिएफ (LDF) ने 87, काँग्रेसने 46, भाजप 6 आणि अपक्ष-इतर 01 असं चित्र पाहायला मिळालं.

केरळमधील पक्षीय बलाबल 2021
एलडिएफ – 94
काँग्रेस – 39
भाजप – 01
इतर – 06
एकूण – 140

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल (Puducherry)
पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. 30 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये एनडिए (NDA) ला 15, काँग्रेसला 10, इतर 5.

पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021
एनडिए -15
काँग्रेस – 09
इतर – 06
एकूण 30

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!