चिंताजनक…. जिल्ह्यात कोरोनाचं शतक पार….पहा तालुका निहाय आकडेवारी…

बीड दि.6 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 924 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 108 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 816 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग चौथ्या दिवशी सर्वाधिक 43 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Worrying …. Corona’s century has passed in the district …. See taluka wise statistics …)
1. बीड- 43 7.माजलगाव-8
2. अंबाजोगाई-8 8.परळी-8
3. आष्टी-7 9.पाटोदा-5
4. धारुर-0 10.शिरुर-1
5. गेवराई-21 11.वडवणी-3
6. केज-4
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.6 शनिवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी तपासणी मोहिम सुरु असून प्रतिसाद मात्र अत्यल्प मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. शिवाय अनेक निर्बंध लावले आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोनाने 10 हजारचा आकडा ओलांडला तसा बीड जिल्ह्याचीही आजची सर्वाधिक 108 रुग्ण संख्या आढळून आली आहे. जिल्ह्यातील कोरोना आकडा पाहता प्रशासनाने आज पासून सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश दिले आहेत.