शेती विषयक

थंडीच्या कडाक्यात पावसाचा तडाखा… ; बीड, लातूरसह या भागात पावसाची शक्यता.

51 / 100

पुणे दि.10 डिसेंबर – थंडीच्या कडाक्यात पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड (Beed), लातूर (Latur), उस्मानाबादसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण (Konkan) या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल अशी शक्यता हवामान विभागानं ( Meteorological Department ) वर्तवली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मंदोस’ (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या रविवारपासून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण (Konkan) या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या भागात रेड अलर्टही (red alert) देण्यात आला आहे. दक्षिणेकडे मोठे परिणाम होत असतानाच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही मोठा परिणाम जाणवणार आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता?
महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे (Pune), सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं ( Meteorological Department ) वर्तवला आहे.

( A burst of rain in the harshness of winter… ; Chance of rain in these areas including Beed, Latur. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!