बीड जिल्ह्यात असे होईल आज लसीकरण; धारुर शहरात लसीकरण केंद्र बदलले.

बीड दि. 12 मे – बीड जिल्ह्यात आज लसीकरण (Vaccination) कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानूसार (Guidelines) जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला व दुसरा डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे.
(This will happen in Beed district today vaccination; Vaccination center changed in Dharur city.)
सर्व तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना आज लसीकरण (Vaccination) होणार आहे. या वयोगटासाठी दररोज 200 जणांना लसीकरण करण्यात येत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोवैक्झिन (Covaxin) लसीचे सत्र धारुर, माजलगाव, परळी, वडवणी, शिरुर व बीड येथे सुरु करण्यात आले होते.
आज बुधवार दि. 12 पासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानूसार अंबाजोगाई, धारुर, माजलगाव, पाटोदा, वडवणी, शिरुर व बीड येथील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवैक्झिन (Covaxin) लसीचा डोस रद्द करण्यात येत आहे. या ठिकाणी शिल्लक असलेल्या कोवैक्झिन लसीचा 45 वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापर करण्यात येणार आहे.
तसेच कोव्हिशिल्ड (Covishield) लस उपलब्ध असलेल्या बीड, केज, परळी, अंबाजोगाई, आष्टी व गेवराई येथील लसीकरण केंद्रात दररोज दुपारी 2 पर्यंत लस उपलब्ध असेपर्यंत स्लॉट ओपन करण्यात येत आहे. यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी अॉनलाईन नोंदणी (Online registration) करुन अपॉइंटमेंटनूसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
धारुर येथे गरड मंगल कार्यालयात होईल लसीकरण…
धारुर शहरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत नगरेश्वर मंदिर कार्यालया ऐवजी गरड मंगल कार्यालय उदयनगर येथे लसीकरण होणार आहे.
मार्गदर्शक सुचनां.
1)45 च्या पुढील लोकांना कोव्हीशिल्ड (Covishield) पहिला व दुसरा डोस दोन्ही उपलब्ध आहे.
2)45 च्या पुढील लोकांसाठी कोवैक्झिनचा दुसरा डोस वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगी ने देण्यात येईल
3) सगळ्यात महत्त्वाचे ज्या लोकांना आता कोरोनाची लक्षणे आहेत किंवा जवळच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशांनी आधी ॲन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट करावी.
लसीकरणा च्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे,मास्क वापरणे, इत्यादी कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचे (Guidelines) पालन करुन नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी केले आहे.