रुपाली चाकणकर यांना धमकी…. काय आहे प्रकरण… पहा

पुणेः दि.२६- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुण्यातील (Pune) कार्यालयात फोन करून एका व्यक्तीनं अर्वाच्च भाषा वापरत त्यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी (Threaten) दिल्याची घटना घडली असून याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यातील (Pune) धायरी येथील गारमाळ परिसरातील ब्रह्मगिरी आर्केडमध्ये रूपाली चाकणकर यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवार दि.२५ रोजी या कार्यालयातील फोन नंबरवर फोन करून त्यांना ही धमकी (Threaten) देण्यात आली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता.वाळवा, जि. सांगली) असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सिंहगड रोड पोलीस (Police) स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी धमकीचा फोन आला. आरोपीनं जयंत रामचंद्र पाटील बोलत असल्याचं सांगून ही धमकी दिली. ‘मला रूपालीबाई चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मोबाइल नंबर दे, ती काय करते ते बघतोच, असंही आरोपी म्हणाला. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली येथून बोलत असल्याचं आरोपीन सांगितलं. रूपाली चाकणकर यांचा नंबर न दिल्यानं आरोपी आणखी चिडला. तो म्हणाला, तुला नंबर द्यायचा आहे की नाही. मी कोण आहे तुला माहिती नाही. तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलीस (Police) बोलवायचे असतील तर बोलव. मी घाबरत नाही. रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देईन, अशा अर्वाच्च भाषेत आरोपीनं धमकी दिल्याचं फिर्यादी स्वीय सहायक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सांगितलं आहे. या माहितीवरून आरोपीविरोधात भादंवि कलम ५०७ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.