दिड लाखाच्या बनावट नोटासह तीघे पोलिसांच्या ताब्यात; सिडको पोलीसांचा धारुरमध्ये छापा

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) शहरातील हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्रावर आज सकाळी औरंगाबाद सिडको (Cidco) पोलिसांनी (Police) छापा टाकत बनावट नोटा प्रकरणी (Counterfeit notes) मुख्य सुत्रधारास छपाईचे साहित्य व काही बनावट नोटांसह ताब्यात घेतले असून या कारवाई मुळे शहरात खळबळ उडाली आहे. सदरील घटना आज दि.९ बुधवार रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. औरंगाबाद येथे काल दिड लाखाच्या बनावट नोटांसह दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर धारुरमध्ये सिडको पोलिसांनी छापा टाकला.

याबाबत सिडको पोलीस गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक प्रमुख पोलिस उपनिरिक्षक (PSI) बाळासाहेब आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद (Aurangabad) येथे टि.व्ही सेंटर परिसरात काल दि.८ रोजी दोन संशयित आरोपी बनावट नोटा (Counterfeit notes) चलनात आणत असल्याची माहिती सिडको (Cidco)पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (Police Inspector) आशोक गिरी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पो.नि.(Police Inspector) गिरी यांच्या आदेशावरुन सिडको पोलिस (Police) गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने टि.व्ही. सेंटर भागातून दोघांचा शोध घेतला. संदीप आरगडे व निखिल संबेराव दोघे रा. बेगमपेठ औरंगाबाद (Aurangabad) यांना ताब्यात घेत आरोपी कडून सुमारे १.५ लाख बनावट नोटा (Counterfeit notes) हस्तगत करण्यात आल्या. आरोपीनी दिलेल्या माहितीवरुन मुख्य आरोपी आकाश संपती माने यास सिडको औरंगाबाद गुन्हे अन्वेषण पथकाने धारुर येथे छापा मारुन आज दि.९ बुधवारी सकाळी अकराला ताब्यात घेतले. या छाप्यात काही बनावट नोटा व छपाईचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी आकाश व आढळलेल्या नोटा, छपाई प्रिंटर व संगणक ताब्यात घेवून औरंगाबाद कडे रवाना झाले. पथकात पोलीस उपनिरिक्षक (PSI) बाळासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नरसिंग पवार, दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, विशाल सोणवने, गणेश नागरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!