भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू; पहाटे दिडच्या सुमाराची दुर्घटना.

अहमदनगर दि.13 फेब्रुवारी – अहमदनगर ( Ahemadnagar ) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. श्रीगोंदा ( Shrigonda ) येथून काष्टी  येथील मित्राला सोडण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार ( Car Accident ) धडकल्याने हा भीषण अपघात झाला.

( Three friends killed in horrific accident; Accident around half past one in the morning. )

मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान सदरील दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेत कार मधून प्रवास करणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकून तिघांचा मृत्यू झाल्यामुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातावेळी तातडीनं बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांना धक्का बसला आहे.

राहुल सुरेश आळेकर (वय 22) ,केशव सायकर (वय 22),आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय 18) हे तिघे मित्र कारमधून श्रीगोंदा येथून काष्टीकडे जात होते. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडण्यासाठी काष्टीला जात असताना हा अपघात झाला.

अपघाताची ( Accident ) माहिती मिळताच अनन्या हॉटेलमधील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आलं. तातडीनं रुग्णवाहिका ( Ambulance ) बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एकाच वेळी तीन मित्रांच्या अपघाती मृत्यूमुळं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!