नदीच्या पुराने घेतला तिघांचा बळी; बीड जिल्ह्यातील वडवणी मधील घटना.

वडवणी दि.6 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू असल्याने नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. काल पासून वडवणी तालुक्यातील पिंपरखेड नदीला पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात (river floods) दुपारी तिघे वाहून गेले असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

(Three killed in river floods; Incidents at Wadwani in Beed district.)

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड नदीला रात्री झालेल्या मुसळधार पावसाने भयानक पूर आलेला आहे. या पुरात मधुकर रोहिदास खळगे वय (50 वर्ष) हे पुरात वाहुन जात असल्याचे मुलगा अजय मधुकर खळगे वय (22 वर्ष) याने पाहताच पुरात उडी घेतली आणि वडिलांना वाचवण्यासाठी गेला. परंतु अजय खळगे हा तरुण पुराच्या बाहेर आलाच नाही.

याचठिकाणी मधूकर खळगे यांचा भाच्चा असणारा अजय उजगरे वय (22 वर्ष) हा येथे आला. डोळ्यासमोरची घटना दिसताच त्याने देखील मामाला व मामाच्या मुलाला वाचविण्यसाठी पुरात उडी घेतली. परंतु दुदैवाने दोघे ही या पुरात वाहुन गेल्याची घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. घटनास्थळी तहसिल व पोलीस (Police) प्रशासन तात्काळ पोहचले होते. सांयकाळी पाचच्या सुमारास देवडी जवळ दोघां युवकांचे प्रेत आढळून आलेत. या दुर्दैवी घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!