केज जवळील भीषण अपघातात तिघे ठार

केज दि.२२(प्रतिनिधी)- केज तालुक्यातील बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर कार व मोटारसायकल मध्ये भीषण अपघात (Accident) झाला असून यात तिघे ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे.
केज (Kaij) बीड रोडवर आज दि.२२ मंगळवार रोजी दुपारी तीन च्या सुमारास कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात (Accident) झाला. झालेल्या अपघातात केज (Kaij) तालुक्यातील सारुळ येथील तिघे ठार झाले. सदरील अपघात नेमका कसा झाला ? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयतात अप्पाराव बापूराव ढाकणे (८०), सुंदर नामदेव ढाकणे (५३), बहादूर राजाभाऊ पुरी (४८) रा. सारुळ यांचा समावेश आहे. सदरील जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघा जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली. मात्र अंबाजोगाई ला पाठवण्यात आलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.