आष्टीत थरार … जन्मदात्या बापावर मुलाने झाडल्या गोळ्या.

आष्टी दि. 20 मे – आष्टी (Ashti) शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या (bullets ) झाडून (Firing) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दि.20 गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढल्याचे दिसत असून कोरोना संकटात अनेक भयंकर गुन्हे समोर येत आहेत.
(Thrill in Ashti … Bullets fired by the child on the birth father.)
दोन दिवसांपुर्वीच बीड तालुक्यात दोन सख्ख्या भावांचा खुन झाल्याची घटना ताजी असताना आज आष्टीत (Ashti) गोळीबाराची (Firing) घटना घडली. आष्टी पोलिसांनी (Police) याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (50) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (24) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी संतोष लटपटे यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते, यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत. या वादातूनच हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलिस आरोपीची सध्या कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे मात्र आष्टी शहर हादरले आहे.