आज व उद्या विकेंड … निर्बंधाबाबत नवीन सुचना; अशी आहे बीड जिल्ह्याची स्थिती.

बीड दि.19 जून – मागील आठवडाभरात बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याऐवजी वाढल्याने बीड (Beed) जिल्ह्यात आणखीन एक आठवडा तरी लॉकडाऊनचे (lockdown) निर्बंध शिथिल होण्याची आशा मावळली आहे. या आठवड्यात बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.11 % इतका नोंदवल्या गेल्याने जिल्हा अजूनही तिसऱ्या लेव्हलमध्येच आहे. त्यामुळे सायंकाळ नंतरची संचारबंदी, शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन (lockdown) आणि इतर निर्बंध (restrictions) कायम राहणार आहेत.

(Today and tomorrow weekend … new instructions about restrictions; Such is the situation in Beed district.)

राज्यात सरकारने अनलॉकसाठी पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) आणि ऑक्सिजन बेडचा वापर यावर आधारित 5 लेव्हल ठरवल्या आहेत. या लेवलचा दर आठवड्यात आढावा घेवून निर्णय घेण्यात येत आहेत. बीड जिल्ह्याचा या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढून 7.11 % इतका झाला आहे. मागील आठवड्यात तो 5.22% इतका होता.

पॉझिटिव्हिटी दर 5 % पेक्षा अधिक असल्याने बीड जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. आणखी एक आठवडा तरी आता हीच लेव्हल (Level) कायम राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधांची परिस्थिती आणखी एक आठवडा तरी जैसे थे असणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.

पॉझिटिव्हिटी कमी झाला तरच निर्बंधांमधून सुटका
जिल्ह्याला संपूर्णतः मोकळा श्वास घ्यायचा असेल तर जिल्ह्यूचं पॉझिटिव्हिटी दर कमी करून जिल्ह्याला पहिल्या किंवा दुसऱ्या लेव्हलमध्ये यावे लागणार आहे. पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडचा वापर 10% पेक्षा कमी झाला तर जिल्हा पहिल्या लेव्हलमध्ये (Level) येऊ शकतो. सध्या ऑक्सिजन बेडचा वापर 11% आहे.

रुग्णसंख्या कमी झाली की हा टक्का देखील कमी होणार आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) 5% पेक्षा कमी आणणे हेच आता आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. तर मृत्यूची संख्या बऱ्यापैकी आहे. जोपर्यंत पॉझिटिव्हिटी दर कमी होत नाही तोपर्यंत निर्बंधातून (restrictions) मुक्तता मिळणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!