आज ॲन्टीजन मध्ये शुन्य मात्र स्वॅब नमुन्यात आले येवढे पॉझिटीव्ह ….

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ९ ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळही पॉझिटीव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आली आहेत. मात्र येथून काल पाठवण्यात आलेल्या १५ स्वॅब (Swab) पैकी तीन पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. एकंदरीत आजही कोरोना बाधितांची संख्या कमी आल्याने समाधानकारक चित्र दिसुन येत आहे.
गेल्या काही दिवसात संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसत आहे. आज केवळ ९ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. या सर्व तपासणीत एकही पॉझिटीव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आले आहेत. परंतू काल पाठवलेल्या १५ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ३ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. अशी एकुण ३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली असून आज २३ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले
१. १९ वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर
२. ७५ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर
३. ३० वर्षीय स्त्री, सुल्तानपुर, ता.माजलगाव
यांचा समावेश आहे.