बीड जिल्ह्यातील सात गुन्हेगारांना लातूर पोलिसांनी केले जेरबंद ; 52 लाखाचा मुद्देमाल जप्त.

लातूर दि.19 अॉगस्ट – बीड जिल्ह्यातील सात गुन्हेगारांना लातूर पोलिसांच्या (Latur Police) वेगवेगळ्या पथकाने एकत्रित केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये जेरबंद करण्यात यश आले आहे. सात अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असून तब्बल एक किलो सोन्याचे दागिन्यासह 52 लाखांचा ऐवज चोरांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे.
( Latur Police arrests seven criminals from Beed district; 52 lakh worth of goods seized. )
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर (Latur) येथील रहिवासी आदित्य शिरीष बंडेवार यांच्या घरी जुलै महिन्यात जबरी चोरी झाली होती. 415 ग्राम सोने आणि पाच लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरले होते. याबाबत लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. लातूरचे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) निखिल पिंगळे यांनी चोरीच्या तपासासाठी तात्काळ पोलिसांची चार पथक तयार केली. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि इतर दोन पथक कामाला लागली आहेत.
याच दरम्यान पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लखन उर्फ अमरदीप जोगदंड राहणार अंबाजोगाई (Ambajogai) , किशोर उर्फ पप्पू जोगदंड राहणार अंबाजोगाई (दोघेही हल्ली मुक्काम पुणे) आणि प्रवीण उर्फ डोळ्या माने अंबाजोगाई यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच संशयितांनी आपल्या साथीदारांचीही नावे सांगायला सुरुवात केली. यात सूर्यकांत मुळे (अंबाजोगाई), अविनाश देवकर (अंबाजोगाई), सुरेश ऊर्फ सुर्यकांत गंगणे (अंबाजोगाई) , सुदर्शन ऊर्जा सोन्याने (रा.परळी) ही नावं समोर आली. सदर सर्व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि परळी भागातील हे सराईत गुन्हेगार आहेत. दोन ते तीन महिने सराईत पद्धतीने गुन्हेगारी करून विदर्भ मार्गे पुण्याकडे (Pune) जाऊन पुढील काही महिने ते लपून बसत असत.
लातूर पोलिसांच्या पथकांनी यंदा मात्र त्यांच्या यवतमाळच्या भागातच मुसक्या आवळल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या अनेक आरोपींवर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालं आहे. या सात आरोपींकडून पोलिसांनी नांदेड, लातूर आणि बीड (Beed) जिल्ह्यात केलेल्या घरफोडी बाबत तपास केला. एकूण 13 ठिकाणी घरफोडी केल्याचं या आरोपीनी कबूल केलं आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 900 ग्रॅम सोन्याची दागिने अंदाजे किंमत 45 लाख रुपये, 500 ग्रॅम चांदी अंदाजे किंमत 33 हजार रुपये, रोख एक लाख वीस हजार रुपये, एक कार, असा एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.