बीड जिल्ह्यात आज ही 265 रुग्ण; बीड अंबाजोगाईच्या चिंतेत वाढ… धारुर व वडवणीत 5… पहा तालुका निहाय आकडेवारी

बीड दि.20 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आजही अडिचशे पारच आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1799 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 265 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1534 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सोळाव्या दिवशी बीड तालुक्यात 108 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 85 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये 5 कोरोना बाधित आढळली आहेत.
(Today there are 265 patients in Beed district; Beed Ambajogai’s worries increase … Dharur and Wadwani 5 … see taluka wise statistics)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड- 108, अंबाजोगाई-85, आष्टी-14, धारुर-5, गेवराई- 9, केज-8, माजलगाव-11, परळी-12, पाटोदा-6, शिरुर-2, वडवणी-5
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.20 शनिवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 265 वर आहे. कालपेक्षा पॉझिटीव्ह संख्या कमी असून तपासणी सःख्याही कमी आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 25 हजार 681 नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळळली आहे. महाराष्ट्र राज्य आशिया खंडात सर्वाधिक रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यात मुंबई पेक्षा जास्त आढळून आली आहेत.