दिलासादायक रविवार… नऊ तालुके दहा पेक्षा कमी; बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित.

बीड दि.22 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4119 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 71 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4048 जण निगेटिव्ह आली आहेत. आजची संख्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालात नऊ तालुक्याची संख्या दहा पेक्षा कमी आहे.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-6, आष्टी-8, धारुर-2, गेवराई-2, केज-10, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-6, शिरुर-4, वडवणी-6 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या आकडेवारीत चांगलाच चढ उतार दिसत आहे. ग्रामीण भागात वेढा घातलेल्या कोरोनाने पुन्हा शहरी भागाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरी भागात काही प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.

दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. शनिवारी 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99टक्के आहे.

राज्यात शनिवारी 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जळगाव (42), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (16), हिंगोली (77), नांदेड (41), अमरावती (93), अकोला (17), वाशिम (5), बुलढाणा (42), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3), गडचिरोली (21) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!