आजची बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.31 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 3664 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 94 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3570 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-23, अंबाजोगाई-5, आष्टी-24, धारुर-9, गेवराई-10, केज-10, माजलगाव-3, परळी-0, पाटोदा-6, शिरुर-2, वडवणी-2 अशी आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी 04 हजार 696 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 741 कोरोना बाधित (corona positive) रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 68 हजार 112 इतकी झाली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.02 टक्के झाला आहे. आज 52 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 51 हजार 834 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 38 लाख 12 हजार 827 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 60 हजार 680 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 88 हजार 489 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 299 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!