आजची बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.1 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4028 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 79 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3949 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-21, अंबाजोगाई-5, आष्टी-29, धारुर-2, गेवराई-2, केज-7, माजलगाव-3, परळी-0, पाटोदा-6, शिरुर-1, वडवणी-3 अशी आहे.
दरम्यान, राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी (state Patient growth) झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत येऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात आज 4,688 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे. तर 4,196 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 51 हजार 238 इतकी आहे.
याच दरम्यान राज्यात 104 कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 64 हजार 876 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 62 लाख 72 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.03 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 02 लाख 91 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 2 हजार 121 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.