जिल्ह्याचं टेंशन वाढलं… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.27 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 5184 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 121 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5063 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या काही दिवसांत उतरलेली संख्या अचानक वाढती दिसत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-37, अंबाजोगाई-3, आष्टी-29, धारुर-11, गेवराई-10, केज-13, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-9, शिरुर-2, वडवणी-6 अशी आहे.

मागील दोन दिवसांत देशासह राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. तर बीड जिल्ह्यातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर चिंताजनक आहे. काही तालुके वगळता पाच तालुक्याची संख्या दोन अंकात आल्याने ही तिसऱ्या लाटेची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, देशात कोरोना च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अजून दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही.

देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली असून 496 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल 32 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 46 हजार 164 रुग्णांची भर पडली होती तर 607 जणांचा मृत्यू झाला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!