काय आहे आजची बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.28 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 4420 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 82 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4338 जण निगेटिव्ह आली आहेत. गेल्या काही दिवसांत उतरलेली संख्या अचानक वाढती दिसत असल्याने जिल्ह्याची चिंतेत भर पढत होती मात्र आज पुन्हा संख्या शंभराच्या आत दिलासा देणारी संख्या आली आहे.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-17, अंबाजोगाई-2, आष्टी-23, धारुर-1, गेवराई-7, केज-12, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-6, शिरुर-1, वडवणी-10 अशी आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची थांबत नसलेली लाट, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूसत्र बीड जिल्ह्यासाठी चिंतेची बाब होऊन बसल्या आहेत. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाणही 2.33 टक्क्यांवर पोचले आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी 4,654 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 55 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

राज्यात शुक्रवारी 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 574 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!