बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने जिवनावश्यक वस्तूच्या किट वाटपास सुरुवात

किल्लेधारुर दि.१(वार्ताहर) येथील बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने सोशल डिस्टंसिंग पाळत शहरातील गोरगरीब, गरजवंत कुटुंबांना दैनंदिन गरज असणा-या जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपाची सुरुवात शुक्रवारी (दि.१) तहसिलदार व्ही.एस.शेडोळकर, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील १५०० गरजवंतांना सदरील किट वाटप करण्यात येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट भरणा-या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. या परिस्थितीची जाण ठेऊन बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने शहरातील गोरगरीब व गरजू कुटुंबांना रोज गरज असणा-या जिवनावश्यक वस्तूच्या १५०० किटचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची आज दि.१ शुक्रवार रोजी तहसिलदार व्ही.एस.शेडोळकर, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, बालाघाट प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते वाटप करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील शंभर ते दिडशे गरजूंना सोशल डिस्टन्सचा वापर करत या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष दत्तात्रय धोतरे, नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, शेख एजाज, संतोष सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, नगरसेवक बाळासाहेब खामकर, बाळासाहेब सोनटक्के, शेख गफार, बालाजी चव्हाण, सुरेश लोकरे, स्विकृत सदस्य सचिन दुबे, राष्ट्रीय खेळाडू आनंदसिंह दिख्खत, ॲड.मोहन भोसले, विरेंद्र अवस्थी, दिपक पटवर्धन आदींची उपस्थिती होती.