कोरोंना विशेष

धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये १३ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यातील ५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेली ११ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत.

गेली चार दिवसात ॲन्टीजन तपासण्या स्वॅब (Swab) नमुने अत्यंत कमी पाठवण्यात आली आहेत. यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही कमी आहे. आज १३ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात ५ पॉझिटीव्ह आढळले तर कालची ११ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज १० जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

१. ३५ वर्षीय पुरुष, वैद्यनाथ नगर, धारुर

२. ३६ वर्षीय स्त्री, पांगरी, ता. धारुर

३. २८ वर्षीय पुरुष, संभाजी नगर, धारुर

४. १८ वर्षीय पुरुष, अंजनडोह, ता. धारुर

५. १९ वर्षीय स्त्री, गायकवाड गल्ली, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!