तीन वर्षीय बालक बेपत्ता

बीडः वडवणी तालुक्यातील ताडसोन्ना येथून एक तीन वर्षीय बालक बेपत्ता असून सदरील बालकाचे अपहरण झाल्याची शंका ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. याबाबत पिंपळनेर पोलिस तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडवणी तालुक्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी ॲड. राजाभाऊ रामदास चोले यांचा तीन वर्षाचा हर्ष काल दि.२८ मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासुन हरवला आहे. गावातील शाळे जवळ खेळत असताना हर्ष अचानक हरवल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र आढळून न आल्याने पिंपळनेर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांत हर्षचे अपहरण झाल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. मुलगा आढळून आल्यास ९१७२४७४७४१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सोशल माध्यमातून करण्यात आले आहे.