सर्पदंशाने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ; धारुर शहरातील घटना.

किल्लेधारूर दि.18 जून – धारूर (Dharur) शहरात जाधव गल्लीत घरात साप चावल्याने (Snake bites) विवाहीत तरूणी प्रिया गणेश माने (वय 25 वर्ष) हिच्यावर उपचार सुरू असताना तिचे उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे निधन (Died) झाले. या तरूणीचे निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विवाहीतेच्या पार्थिवावर जैतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
(The unfortunate death of a married woman by a snakebite; Incidents in Dharur city.)
धारूर (Dharur) तालूक्यातील मुळ जैतापूर येथील रहिवाशी असणारे व सध्या धारूर शहरातील कसबा विभागात जाधव गल्ली येथे राहणारी तरूणी विवाहित प्रिया गणेश माने (वय 25 वर्ष) हिला घरातच आठ दिवसांपुर्वी साप चावल्याने (Snake bites) तिच्या वर धारूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने तिला अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.
अंबाजोगाई येथे उपचार सुरू असताना आज दि.18 शुक्रवारी सकाळी प्रिया माने हिचे निधन (Died) झाले. या तरूण विवाहितेच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पार्थिवावर दुपारी जैतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन वर्षाच्या मुलीकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
या विवाहीतेला दोन वर्षाची आदीरा नावाची मुलगी आहे. दोन वर्षाच्या आदीराकडे पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले होते. विविहितेच्या अकाली निधनाने व लहान मुलीकडे पाहुन धारुर व जैतापुरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.