कोरोंना विशेष

वाहनधारकांनो सावधान आता शहरात वाहतूकीला अडथळे;

बाजाराच्या भागात बॕरिकेटिंग

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) शहरातील गर्दीच्या ठिकाणी वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषद व पोलिस प्रशासनाने मुख्य रस्त्यावर व बाजारतळाकडील रस्त्यावर ठिकठिकाणी बॕरेकेटिंग करुन अडथळे निर्माण केले आहेत. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना मुख्य रस्त्यावर प्रवेश बंद झाला आहे.

गेल्या विस दिवसांपासुन सुरु असलेल्या लॉकडाऊन मधील संचारबंदीत लोकांना संचारबंदी शिथिलता दिलेली आहे. या शिथिल वेळेत लोकांची होणारी गर्दी पाहता सतत प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. तरीही गर्दी आटोक्यात येत नसल्याने नगर परिषद प्रशासन व पोलिस प्रशासनाने धारुर शहरातील मुख्य बाजारपेठ व बाजारतळाकडील जोडणारी सर्व लहान मोठ्या रस्त्यावर बॕरिकेटींग केली आहे. आज रात्री उशिरापर्यंत या बॕरेकेटींगचे काम सुरु होते. या बॕरिकेटींगमुळे जोड रस्त्यावरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनास अडथळा निर्माण होणार असुन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!