दिलासादायक सोमवार; बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.5 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 2166 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 104 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2062 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तपासणी अहवालांची संख्या कमी आहे. अहवालात माजलगाव शुन्य तर काल अधिक संख्या असलेल्या तालुक्याची संख्या आटोक्यात आली आहे.

(Today’s corona update from Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-19, अंबाजोगाई-1, आष्टी-24, धारुर-3, गेवराई-14, केज-8, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-12, शिरुर-16, वडवणी-6 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शंभर तर दोनशेमध्ये स्थिरावली आहे. राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत कमालीची घट झालेली आहे. जिल्ह्यात काल अचानक वाढलेली संख्या आज मात्र आटोक्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पाठिमागील 24 तासात 9,336 जणांना कोरोना संसर्ग झाला. तर, 3,378 जणांना डिस्चार्ज मिळाला. 123 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 58,48,693 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.91 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1,23,030 करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!