बुधवारी 188… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.7 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 3842 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 188 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3654 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-31, अंबाजोगाई-13, आष्टी-46, धारुर-7, गेवराई-25, केज-10, माजलगाव-6, परळी-2, पाटोदा-21, शिरुर-6, वडवणी-1 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वेग मंदावला आहे. सध्या दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली आहे. राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत कमालीची चड उतार पहावयास मिळत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे
8418 नवीन प्रकरण झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूमुळे 171 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन घटनांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे. मंगळवारी एकूण 10,548 लोक बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 8 हजाराहून अधिक नवीन रुग्णांसह संक्रमित लोकांची एकूण संख्या 61,13,335 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 58,72,268 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 171 लोकांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकूण मृतांचा आकडा 1,23,531 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या अद्याप 1,14,297 आहे.