रविवारीही दिडशे पार…बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.11 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत आहे. आज 3915 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 157 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3758 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona update from Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-34, अंबाजोगाई-6, आष्टी-33, धारुर-5, गेवराई-23, केज-14, माजलगाव-2, परळी-3, पाटोदा-20, शिरुर-7, वडवणी-10 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मंदावला वेग अधूनमधून वाढत आहे. दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली असताना अचानक वाढ दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. आजही संख्या 157 आहे.

दरम्यान, राज्यात आज 8 हजार 296 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 06 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चार जिल्ह्यामध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!