शुक्रवारी संख्या वाढली… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.25 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3786 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 176 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3610 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढलेली दिसुन आली.

(Today’s Corona Update in Beed District;)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-13, अंबाजोगाई-3, आष्टी-63, धारुर-3, गेवराई-24, केज-14, माजलगाव-6, परळी-4, पाटोदा-28, शिरुर-15, वडवणी-3 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. राज्यात नवीन डेल्टा प्लस वेरिअंटचा धोका वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेने अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडकपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी  9 हजार 317 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 95.93 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी  9 हजार 844 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत राज्यातल्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या 60 लाख 7 हजार 431 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी  197 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्याचा मृत्यू दर हा 2 टक्के झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 859 रूग्णांचा कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. गुरूवारी जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यामध्ये इतक्या दिवसात पहिल्यांदाच मृत्यूदर हा 2 टक्के झाला असल्याचं पाहण्यास मिळालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!