दिलासादायक गुरुवार … मात्र धारुरात वाढ… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.1 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3858 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 103 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3755 जण निगेटिव्ह आली आहेत. काल बुधवारच्या अहवालातही पॉझिटीव्हची संख्या वाढल्याचे दिसून आले.

(Today’s corona update in Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-11, अंबाजोगाई-4, आष्टी-21, धारुर-11, गेवराई-15, केज-7, माजलगाव-6, परळी-2, पाटोदा-17, शिरुर-4, वडवणी-5 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात दररोज शंभर तर दोनशेमध्ये संख्या स्थिरावली आहे. तर राज्यातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. लोकांत निर्बंधाचा परिणाम जाणवत नसल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 9 हजार 771 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 353 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 58 लाख 19 हजार 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.02 टक्क्यावर गेला आहे.

राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख 37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!