बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.2 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3189 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 111 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3078 जण निगेटिव्ह आली आहेत. काल गुरुवारी पॉझिटीव्हची संख्या अलिकडीलची सर्वात कमी दिसून आली.
(Today’s corona update in Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-14, अंबाजोगाई-4, आष्टी-17, धारुर-5, गेवराई-8, केज-9, माजलगाव-3, परळी-6, पाटोदा-30, शिरुर-8, वडवणी-7 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात दररोज शंभर तर दोनशेमध्ये संख्या स्थिरावली आहे. काल ही संख्या 103 वर होती. तर राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 9 हजार 295 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 634 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 58 लाख 28 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.01 टक्क्यावर गेला आहे.
राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 18 लाख 75 हजार 217 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 70 हजार 599 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.