बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; धारुर 68 तर केज 173, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.12 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4288 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1270 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3018 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; Dharur 68 and Kaij 173, see taluka wise statistics.)

आज अठ्ठावनाव्या दिवशी बीड तालुक्यात 213 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 174, आष्टी तालुक्यात 146 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 68 तर केजमध्ये 173 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-213, अंबाजोगाई-174, आष्टी-146, धारुर-68, गेवराई-142, केज-173, माजलगाव-74, परळी-58, पाटोदा-40, शिरुर-141, वडवणी-41 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या बाराशेवर स्थिर आहे. दररोज येणारी आकडेवारी पेक्षा आता बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील व 45 पेक्षा जास्त वयोगटातील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आज शिथिलतेचा दुसरा दिवस प्रचंड गर्दीचा ठरला. लसीकरण व फळ, भाजी विक्रेत्यांना दिलेली सुट यामुळे तुफान गर्दी होत आहे.

दरम्यान, देशात सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!