बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; धारुर वाढले, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.3 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3310 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 322 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2988 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही पाचशेच्या आत आल्याने दिलासा मिळत आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात सलग दोन दिवसांपासून संख्या शंभरच्या आत आहे. आजही 74 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. रुग्णसंख्येत सतत मोठा आकडा असलेल्या अंबाजोगाईत गेल्या आठवड्यापासून समाधानकारक स्थिती आहे. बीडनंतर सध्या आष्टीत रुग्ण संख्या इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे. आज अंबाजोगाईत केवळ 16 व आष्टी तालुक्यात 60 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 28 तर केजमध्ये 25 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-74, अंबाजोगाई-16, आष्टी-60, धारुर-28, गेवराई-33, केज-25, माजलगाव-22, परळी-4, पाटोदा-17, शिरुर-28, वडवणी-15 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) मध्ये 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सकाळी 7 ते 11 पर्यंत खुल्या राहणार आहेत. याशिथिल काळात मोठी गर्दी होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन करत पुन्हा कडक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात 285 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 96 हजार 751 इतका झाला आहे. मात्र, त्याचवेळी राज्याचा मृत्यूदर 1.67 टक्के इतका झाला आहे.

एकीकडे मृतांचा आकडा खाली आल्यामुळे दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे नव्या कोरोना बाधितांची संख्या देखील काहीशी स्थिर झाली आहे. दिवसभरात राज्यात 15 हजार 169 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 57 लाख 76 हजार 184 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आजघडीला 2 लाख 16 हजार 16 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!