चिंता वाढली, आज पुन्हा वाढ… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा काय आहे आजची परिस्थिती.

बीड दि.21 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात काल रुग्ण संख्येत मोठी वाढ दिसून आली ती आजही कायम आहे. आज मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे 5374 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 238 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5136 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-37, अंबाजोगाई-11, आष्टी-57, धारुर-13, गेवराई-33, केज-14, माजलगाव-7, परळी-0, पाटोदा-36, शिरुर-21, वडवणी-9 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत कालची संख्या सर्वाधिक होती. यामुळे चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने आष्टी, गेवराई व पाटोदा तालुक्यासह शिरुर कासार तालुक्यातही काल पासून निर्बंध कडक करण्याचे आदेश काढली आहेत.
दरम्यान, राज्यात सोमवारी 66 रुग्ण दगावले होते, त्यात वाढ होऊन मंगळवारी 147 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,30,753 वर पोहोचला आहे. आज सर्वाधिक 55 मृत्यू कोल्हापूर मंडळात नोंदवण्यात आले. तर ठाणे 39, पुणे 9,औरंगाबाद 3,नाशिक 37,अकोला 1,नागपूर 1 व लातूर मंडळ 2 मृत्यू नोंदवले गेले. आज मृत्यूदारात ही वाढ झाली असून मृत्यूचा दर 2.4 वरून 2.09 टक्के इतका झाला आहे.
मंगळवारी दिवसभरात 6,910 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62,29,596 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,593 पर्यंत खाली ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.