बीड जिल्ह्यात रविवारी आढळले 200 कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.1 अॉगस्ट – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 5364 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 200 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5164 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-52, अंबाजोगाई-2, आष्टी-48, धारुर-9, गेवराई-9 केज-9, माजलगाव-8, परळी-1, पाटोदा-24, शिरुर-30, वडवणी-8 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

बीड (Beed) जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्बंध व विकेँड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आवमेळ पहायला मिळत आहे. राज्यात बीडबाबत चिंता व्यक्त होताना जिल्ह्यात मात्र सतर्कता पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात कोरोना स्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,959 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे.

तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,79,67,609 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,03,715 (13.14 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!