मंगळवारी दिलासा… बीड जिल्ह्यात आज आढळले येवढे कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.3 अॉगस्ट – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 3622 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 124 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3458 जण निगेटिव्ह आली आहेत. आजची संख्या उतरली आहे मात्र आज कोरोना तपासणी अहवाल कमी आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-28, अंबाजोगाई-4, आष्टी-25, धारुर-4, गेवराई-20, केज-6, माजलगाव-3, परळी-0, पाटोदा-18, शिरुर-10, वडवणी-6 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

राज्य शासनाने नवीन नियमावली जाहिर करताच बीड (Beed) जिल्ह्यातही प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्बंधाबाबत नवीन आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्याला तिसऱ्या लेवलमध्ये कायम ठेवण्यात आलेले असून जुनीच नियमावली पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. यामुळे राज्य शासनाच्या नवीन आदेशाचे कसलेही परिणाम जिल्ह्यात दिसून येणार नाहीत.

महाराष्ट्राची कोरोना स्थिती.
दरम्यान, राज्यात आज 4,869 नवीन कोरोना बाधित Corona Positive) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.

राज्यात आज कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!