किंचित वाढ… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.4 अॉगस्ट – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 4868 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 181 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4687 जण निगेटिव्ह आली आहेत. कालपेक्षा आजची संख्येत किंचित वाढ झाली आहे.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-51, अंबाजोगाई-3, आष्टी-55, धारुर-4, गेवराई-13, केज-10, माजलगाव-6, परळी-0, पाटोदा-15, शिरुर-14, वडवणी-10 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

काल बीड (Beed) जिल्ह्यात 124 रुग्ण संख्या होती. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी संख्या होती. जिल्ह्यातील चार तालुक्यात अद्यापही कडक निर्बंध आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्कता बाळगत आहे.

महाराष्ट्रात कोरोना.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 6 हजार 5 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 799 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती 75 हजारांच्या खाली आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित Corona Positive) रुग्णांची संख्या 63 लाख 21 हजार 068 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 10 हजार 124 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 74 हजार 318 सक्रिय कोरोना रुग्णांवर (Corona patients) उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 177 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!