बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.9 अॉगस्ट – आज सोमवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 3648 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 167 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3481 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-55, अंबाजोगाई-5, आष्टी-39, धारुर-10, गेवराई-10, केज-13, माजलगाव-3, परळी-0, पाटोदा-15, शिरुर-16, वडवणी-1 अशी आहे.
रविवारी जिल्ह्यात 216 नवीन बाधितांची भर पडली होती. तर गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या तब्बल 6 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद आरोग्य प्रशासनाने केली. धक्कादायक बाब म्हणजे रविवारी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एक संशयित रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी राज्यात 4,895 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 61 लाख 44 हजार 388 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के आहे. रविवारी 151 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे.
महाराष्ट्रात 71 हजार 510 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील 63 लाख 53 हजार 328 कोरोना रुग्णांपैकी 61 लाख 44 हजार 388 जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात 1 लाख 33 हजार 996 मृत्यू झाले आणि 3 हजार 434 कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.10 टक्के, पॉझिटिव्हिटी रेट 12.82 टक्के तर रिकव्हरी रेट 96.71 टक्के आहे.