माझं गाव

धारूर घाटातील दरीत कोसळून ट्रकचा चुराडा.

54 / 100

किल्ले धारूर दि.28 जुन – धारूर घाटातून परतूरकडे 22 टन खत घेऊन जाणारा ट्रक कठडा तुटून 100 फूट दरीत कोसळून ट्रकचा चुराडा झाला आहे. हा अपघात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला . या अपघातात चालक व क्लिनर बचावले असून ट्रकचा चुराडा झाला आहे . ट्रक उस्मानाबादहून परतूरकडे खत घेऊन जात होता . ( The truck crashed into the valley of Dharur Ghat. )

धारूर घाटात मालवाहू ट्रकच्या अपघाताची मालिका सुरूच आहे . महिनाभरातून दोन ते तीन अपघात हे नित्याचेच झाले आहेत . या घटनेकडे काळजीपूर्वक अद्याप कोणीच पाहत नाही . सोमवारी रात्री उस्मानाबाद येथून परतूर कडे सुपर फास्फेट 22 टन खत घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटातून जात होता . यावेळी धोकादायक वळणाच्या ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक लोखंडी कठडा तोडून शंभर फूट दरीत कोसळला .

रात्रीची वेळ असल्यामुळे अपघातस्थळी मोठा अंधार होता .या अपघातात चालक व क्लीनर बचावले आहेत . अपघातामध्ये अक्षरशः ट्रकचा चुराडा झाला आहे. ट्रकमधील खताचे पोते पूर्णपणे बाजूला विखरुन पडले आहेत . यामध्ये अनेक खताचे पोते फुटले आहेत . या अपघातामुळे घाटभिंतीला लावलेली लोखंडी ग्रील पूर्णपणे तुटून खाली पडली. घाटात सदर अपघातग्रस्त ट्रक पाहण्यासाठी दिवसभर प्रवासी लोकं गर्दी करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!