फक्त याच लोकांना मिळणार लस; 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती.

दि.26 एप्रिल – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर (Vaccination) मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस (Vaccine) देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याची नोंदणी 28 एप्रिल पासून को-विन अँपवर करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
(Only these people will get the vaccine; Extremely important information for people between the ages of 18 and 45.)
लस घेण्यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची नोंदणी करावी लागेल. लस घेण्याची वेळ व दिवस निश्चित केला जाईल. को-विन ॲपवर (Cowin app) नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांना लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.
त्यामुळे तुम्हाला लस (Vaccine) घ्यायची असेल तर आधी को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. 18 वर्षावरील लसीकरिता पात्र नागरिकांना को-विन अँप वर नाव नोंदवता येईल. को-विन अॅप (Cowin app) वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर एसएमएसदारे (SMS) त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावं लागेल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला इतर महत्वाची माहिती विचारण्यात येईल. यात प्रामुख्याने तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग, छायाचित्र आयडी, छायाचित्र ओळखपत्र प्रकार इत्यादींचा समावेश असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीवर बटन वर क्लीक करा.
एकदा नोंदणी झाली की लसीकरणा (Vaccination) संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एसएमएसद्वारे (SMS) पाठवण्यात येईल. तसेच लस घ्यायची असल्यास याकरता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिक 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (registration) करू शकतील. खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करायचं असेल, तर पैसे मोजून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध असेल. सरकारी आणि खासगी असे दोन्ही पर्याय रुग्णांना उपलब्ध असतील. मात्र सरकारी केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (registration) ही एकमेव पद्धत असणार असून थेट केंद्रावर जाऊन लस मिळवण्याचा पर्याय आता उपलब्ध असणार नाही.
महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र खासगी रुग्णालयातही हे डोस उपलब्ध असणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस राज्य सरकारांना 400 रुपये, तर खासगी हॉस्पिटल्सना 600 रुपये या दरानं विकत मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारांना 600 रुपयांना तर खासगी हॉस्पिटल्सना 1200 रुपये दरानं मिळणार आहे.
दरम्यान, देशात सध्याच्या घडीला 28 लाख 13 हजार 658 अॅक्टिव्ह रुग्ण असून 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 जणांचा लसीकरण झालं आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.