धारुर तालुक्यातील वृक्षमित्र हरवला; ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे यांचे निधन.

किल्लेधारूर दि.27 जानेवारी – तालुक्यातील सोनिमोहा येथील ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे (वय 54) यांचे आज गुरुवारी (दि.27) पहाटे निधन झाले. ते किर्तनकार व वृक्षमित्र म्हणून परिचित होते.
(Lost tree friend in Dharur taluka; Death of Shivaji Maharaj Tonde.)
धारुर (Dharur) तालुक्यातील सोनीमोहा येथील वृक्षप्रेमी ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे तालुक्यात सुपरिचित होते. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन समाजजागृती करण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते. त्यांचे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दीर्घ आजारामुळे अंबाजोगाई (Ambajogai) येथील शासकीय रुग्णालयांमध्ये (SRTR) उपचार घेत असताना निधन झाले.
ह.भ.प. शिवाजी महाराज तोंडे आपल्या किर्तन सेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधन याचबरोबर महाराष्ट्रभर वृक्ष लागवड व संगोपन यावर शेकडो व्याख्याने देण्याचे काम त्यांनी केले होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं असा परिवार आहे.
सोनीमोहा येथील पाणी फाउंडेशनची वॉटर कप (Water Cup) स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. तोंडे महाराज यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सोनिमोहा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 54 व्या वर्षी तोंडे महाराजांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
आज (दि.27) गुरुवारी दुपारी 12.30 वाजता सोनिमोहा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा कार्यकर्ता व वृक्षमित्र (Vrikshmitra) हरवला आहे. तोंडे यांच्या अकाली निधनामुळे सोनिमोहा गावावर शोककळा पसरली आहे.