आजची संख्या सर्वात कमी…बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.16 अॉगस्ट – आज सोमवारी अलीकडच्या काळातील बाधितांची संख्या शतकाच्या आत आली आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 4831 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 92 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4739 जण निगेटिव्ह आली आहेत. दुसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी संख्या असल्याने दिलासा मिळाला आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-11, अंबाजोगाई-1, आष्टी-38, धारुर-5, गेवराई-5, केज-8, माजलगाव-4, परळी-0, पाटोदा-13, शिरुर-4, वडवणी-3 अशी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दिलासादायक आकडेवारी आहे. दिडहून पुढे असलेली बाधितांची संख्या शंभर ते दिडशेच्या आत आली आहे. आज ही संख्या शंभरीच्या आत आल्याने दिलासा मिळत आहे. दरम्यान, नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी काल दि.15 पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केली आहेत.
दरम्यान, राज्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोनाच्या रुग्ण व बळींच्या संख्येत मोठी घट झाली. दिवसभरात 4 हजार 797 नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले, तर 130 जणांचा मृत्यू झाला. याचवेळी 3,710 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. काही जिह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली.
राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.26 टक्क्यांवर गेले आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्युदर 2.19 टक्के असा नियंत्रणात आहे. आतापर्यंत 61 लाख 81 हजार 933 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 64 हजार 219 इतकी असून मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3,096 पर्यंत खाली आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारीचा विचार करता पुणे जिह्यात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक 14 हजार 748 इतकी आहे.