शुक्रवारी दिलासा…. बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.20 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 5335 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 93 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5242 जण निगेटिव्ह आली आहेत. आठवड्यात आज दुसऱ्यांदा शंभरच्या आत दिलासादायक संख्या आली आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-18, अंबाजोगाई-3, आष्टी-34, धारुर-5, गेवराई-5, केज-6, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-12, शिरुर-3, वडवणी-5 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. परंतू अद्यापही कोरोना बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट 2 टक्क्याच्या खाली उतरलेला नसून बाधितांची संख्या 100 च्या वरच आहे. सध्या जिल्ह्यातील 759 गावे कोरोनामुक्त झाली असून 14 गावांमध्ये पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरी गुरुवारच्या अहवालात 143 तर आज 93 नवीन बाधितांची भर पडली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 225 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 154 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण 5 हजार 557 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 14 हजार 921 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.93 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.11 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.