चिंताजनक.. आज मोठी वाढ…. बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.28 जूलै – बीड (Beed) आज बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे 5009 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 241 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4768 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-50, अंबाजोगाई-5, आष्टी-44, धारुर-16, गेवराई-29, केज-10, माजलगाव-5, परळी-1, पाटोदा-33, शिरुर-39, वडवणी-9 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित आढळत आहेत. अंबाजोगाई व परळीत मात्र संख्या आटोक्यात आलेली आहे. इतर उर्वरित तालुक्यात तुरळक प्रमाणात बाधित आढळत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत कोरोनाने व्यापला आहे.
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती.
दरम्यान, राज्यात दिवसभरात राज्यात 06 हजार 258 नव्या कोरोना बाधित (Corona positive) रूग्णांची नोंद करण्यात आली तर 12 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 254 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 60 लाख 46 हजार 106 कोरोना बाधित (Corona positive) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.15 टक्के एवढं झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.