बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.28 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 6669 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 700 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5969 जण निगेटिव्ह आली आहेत. आज काल पेक्षा रुग्ण संख्येत किंचित वाढ आढळून आली.
(Today’s corona update in Beed district; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 251 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील बीड पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यात 39 व आष्टी तालुक्यात 56 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 21 तर केजमध्ये 64 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-251, अंबाजोगाई-39, आष्टी-56, धारुर-21, गेवराई-83, केज-64, माजलगाव-46, परळी-14, पाटोदा-48, शिरुर-55, वडवणी-23 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. काही प्रमाणात ग्रामीण भागातील संख्याही उतरत आहे. जिल्ह्यात वाढवण्यात आलेल्या सहा दिवसांच्या लॉकडाऊनची कठोर अमलबजावणीमुळे चित्र बदलत आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत असताना ब्लॅक फंगसची रुग्ण मात्र वाढत असल्याचे दिसुन येत आहे.
दरम्यान, गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज दिवसभरात 425 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रमाण 453 इतकं होतं. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने 500 च्या वर राहिलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी मृत्यूंची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब ठरली आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर 1.63 टक्के इतका आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर!
राज्यात मृतांच्या कमी झालेल्या संख्येप्रमाणेच नव्या करोनाबाधितांची संख्या देखील दिलासा देणारी ठरली आहे. आज दिवसभरात राज्यात 21 हजार 273 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांत 60 हजारांवरून 21 हजारांवर आलं आहे. त्यासोबतच आज दिवसभरात 34 हजार 370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 52 लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील 93.02 टक्के इतका वाढला आहे!