बीड जिल्ह्यातील मंगळवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.9 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2893 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 146 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2667 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचेही दिसत आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बीड तालुक्यात 22 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. अंबाजोगाईत ही समाधानकारक स्थिती आहे. आज अंबाजोगाईत 13 व आष्टी तालुक्यात 16 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 13 तर केजमध्ये 26 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-22, अंबाजोगाई-13, आष्टी-16, धारुर-13, गेवराई-9, केज-26, माजलगाव-12, परळी-13, पाटोदा-11, शिरुर-8, वडवणी-3 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आता घटली आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. काल पेक्षा आज आणखी संख्या उतरुन दिडशेच्या आत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३५% एवढे झाले आहे.

आज राज्यात १०,८९१ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज २९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!